आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थींसाठी सर्व सुविधा मोफत:जिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी (दि.२) जिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत हे शिबिर होईल. उद्घाटन सकाळी ११ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी सहकारमंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहतील. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरामध्ये लाभार्थींसाठी सर्व सुविधा मोफत दिल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...