आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबिर:महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर; अंबड चौफुली येथे घेण्यात आले शिबिर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदूसूर्य मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांची जयंतीचे औचित्य साधून शहरातील अंबड चौफुली येथे मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेे होते. या शिबिराचे उदघाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेश सदस्य रामेश्वर भांदरगे, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, भाजयुमो जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, भाजयुमो शहराध्यक्ष सुनील खरे, नगरसेवक महेश निकम, वैद्यकीय आघाडीचे अमोल कारंजेकर, अमरदीप शिंदे, आनंद झारखंडे, मनोज खरात, महेश इंगळे, मनोज इंगळे, रिजवान जहागीरदार, राकेश निर्मल, दीपक बोर्डे, दौलतराव सोळुंके, डॉ. सतीशचंद्र प्रभू, तुलजेश चौधरी, प्रा. राजेंद्र भोसले, धनसिंह सूर्यवंशी, सचिन क्षीरसागर, अशोक पडोळ, राहुल गवारे, संजय देठे, डॉ. संदीप चोपडे, डॉ. सचिन दहिवाळ, ईश्वर बिल्होरे, सुखलालसिंग राजपूत, विठ्ठल नरवडे, दीपक बोर्डे, मंगेश साळुंखे, बद्रीनाथ मोहिते, बालाजी पाटील, योगेश आघाव, सुशांत शेळके, व डॉ.हर्षवर्धन दाभेराव (राजपूत) यांच्या परिवारातील रामदास नामदेव दाभेराव, स्नेहलता रामदास दाभेराव, डॉ. प्राजक्ता दाभेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजन डॉ. हर्षवर्धन दाभेराव (राजपूत) यांच्यासह समाज प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.दरम्यान, या शिबिराचा अंबड चौफुली तसेच जालन्यातील विविध भागांतील गरजू नागरिकांनी लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...