आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:देवगाव येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र उत्सव निमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित या संकल्पनेतून देवगाव खवणे येथे ग्रामपंचायत व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलाकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात हिमोग्लोबीन तपासणी, बीपी तपासणी, शुगर तपासणी इत्यादी तपासणी करण्यात आल्या. या वेळी सरपंच संदीप मोरे म्हणाले की, प्रत्येक स्त्रीने आपले घर स्वच्छ ठेवावे, तसेच परिसर स्वछ ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी उपसरपंच जीवन चिंतामणी, ग्रामपंचायत सदस्य वसंतराव मोरे, बंडू मोरे, संतोषराव खवणे, बबनराव साळवे, महादेव खवणे, प्रकाश दहीजे, एम.ओ. डॉ. मांटे, सुपरवायझर मीनाक्षी गवळी, एच.ओ.बनसोडे, पी.डब्लू क्षीरसागर, आशा सेविका खवणे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...