आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. यामुळे बालकांना गोवरची लस तातडीने देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहेत.हा आजार मुख्यत्वे ५ वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहनारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरिरावर लाल व सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्यकर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होवू शकते. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेला सारख्या सर्व आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते. आपल्या कुटुंबातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना गोवरची लस तातडीने देण्यात यावी. लसीकरण मोहिमेस सर्व प्रकारे सहकार्य करणे आवश्यक आहे. असे आवाहन आरोग्य विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. गोवर प्रभावित भागातील कार्याचा प्रगतीपर तपशिल- व्हिटॅमिन-ए ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या ३४ (संशयीत गोवर रुग्ण) असून गोवर रुबेला लसीकरण सर्वेक्षणात ४३०१ बालके आढळुन आली यात पहिला डोस देण्यात आलेली २०७१ तर लसीकरण न झालेली बालके २२९४ अशी आहेत.
तसेच दुसरा डोस देण्यात आलेली बालके १६११ तर लसीकरण न झालेली बालके २००७ अशी आहेत. जिल्हास्तरावर एकुण गोवर रुबेला लस साठा ७०० इतका साठा आहे. गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनातंर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती नियमित आढावा बैठक घेण्यात येते. निश्चित निदान झालेल्या भागात घरोघरी लसीकरण सुरु आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.