आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तिमल बंब यांचे प्रतिपादन:आरोग्य हीच आपली खरी संपत्ती होय; शिबिराच्या माध्यमातून होतेय मानवसेवा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे अनेक कार्यक्रम होतात पण आरोग्य शिबीर सर्वात महत्वाचे आहे. खर सुख आपल्या आरोग्यात आहे. जालन्यात रस्त्याची दुरअवस्था आहे, ठिक-ठीकाणी खड्यामुळे वाहन चालविणे कठीण आहे. अनेक प्रकाराचे अपघात सुध्दा होतात. हाडांचे - मणक्यांचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणावर आहे. आर्थिक दृष्टीने कुमकुवत लोकांना पुणे येणे जाणे तेथील खर्च परवडत नाही. जसे नेत्रदान, रक्तदान, देहदान, आर्थिक सहाय्य त्याच प्रमाणे पुण्याचे संचेती हॉस्पिटल यांचे तज्ञ डॉक्टरांची टीम मोफत सेवा देत आहेत. आरोग्य हिच आपली खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी सांगितले.

भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ, कॅट व जनरल मर्चन्ट असोसिएशन जिल्हा जालनाच्या संयुक्त विद्यमाने संचेती हॉस्पिटल, पुणे यांच्या तज्ञ डॉक्टर्स टीम द्वारा हाडांचे व मणक्यांचे मोफत तपासणी व रोग निदान एक दिवसीय शिबीर जैन भवनात पार पडले. यात पद्मभूषण प्राप्त प्रख्यात अर्थोपिडीक डॉ. पराग संचेती यांचे तज्ञ डॉक्टर्स निषाद सितूत, डॉ. भूषण पाटील, डॉ. प्रतिक गुंडरे, डॉ. विनित बांगड, डॉ. कोमलसिंग, डॉ. निकीता बुधवाणी, तुषार काशीद, श्रीकांत कुलकर्णी सर्व मेडीकल साहित्य व मशिनरी सह पुण्याहुन जालना येथे आले होते. सर्व डॉक्टरांच्या वेग-वेगळे कक्ष लावून शिबीर प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी महिला आघाडीची निता मुथ्था, मंजु कोटेचा, भारती मुथ्था, आनंदी अय्यर यांनी नमस्कार महामंत्र सादर केले.

जिल्हाध्यक्ष दिनेश राका यांनी शहरातील व ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने शिबीरात आल्याने गोर-गरिबांना याचा लाभ मिळेल. गरजुमंदाना साहाय्य करणे हे संघटनेचे मुख्य उद्देश्य आहे. सतिष पंच म्हणाले, शिबीर घेणे फार गरजेचे आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. संतोष मुथ्था यांनी पुढील शिबीर गुरु गणेश मुथ्था हॉस्पिटल येथे मोफत आयोजित करू अशी घोषणा केली. या शिबीरात सांधेदुःखी, संधीवात, सांधे प्रत्यारोपण, कंबर दुःखणे, हातपायांना मुंग्या येणे, मणक्यांचे इ. जुने आजार मशिनरी द्वारे कॅलशियम, फिजीओथेरॅपी तपासणी करुन मार्गदर्शन, सल्ला देण्यात आला. शिबीरात २१८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी बंब व पंच यांच्या मार्गदर्शनाखाली अभय सेठिया, कैलास लुंगाडे, चेतन देसरडा, प्रविण मोहता, दिपक मिश्रीकोटकर, शिखरचंद लोहाडे, नरेन्द्र जोगड, मकरंद सावजी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...