आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्याध्यापक आबुज यांचा गौरव

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदनझिरा सारख्या कामगार वस्ती व झोपडपट्टी भागात कोवीड लसीकरण मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. आबुज यांचा आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना भोसले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खादगावकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनी, डॉ. संगीता राजे - देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या गौरवाबद्दल संस्था अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक वर्गाने आबुज यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...