आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्र्यंना मातृशोक:आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई अत्यवस्थ असतानाही राज्यासाठी आरोग्यमंत्र्यांची झुंज

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे (७२) यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर बाॅम्बे हाॅस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू होते. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यातूनच उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुलगी डाॅ. वर्षा देसाई, सून, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी म्हणून शारदाताईंची ओळख होती. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर (ता. अंबड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आई अत्यवस्थ असतानाही राज्यासाठी आरोग्यमंत्र्यांची झुंज

कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आई अत्यवस्थ असतानाही त्यांनी राज्यात सतत दौरे करून कोराेनाशी झुंज सुरू ठेवली. रोज सकाळी आणि रात्री उशिरा रुग्णालयात ते आईची भेट घेत.

बातम्या आणखी आहेत...