आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा भोकरदन तालुक्यातील वाकडी आणि परिसरात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण, मध्येच झालेला अवकाळी पाऊस व बदललेल्या हवामानामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ढगाळ व दमट हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक भागात गारवा वाढला आहे. तसेच, या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या अनेक गावांमध्ये सर्दी, खोकल्याबरोबरच दमा तसेच हात-पाय दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे.
भोकरदन तालुक्यातील वाकडी परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याची धावपळ होत होती. आता अचानक ढग आल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत.यामुळे भाजीपाला व इतर पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नुकसानीच्या भीतीने बळीराजा अधिक प्रमाणात धास्तावला आहे. आरोग्याच्या समस्या वाढल्या अषून बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे.
शनिवार रोजी सकाळपासून गारवा जाणवत असल्याने आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दररोज रुग्णालयांमध्ये ओपीडीमध्ये रुग्ण सर्दी, खोकला आणि इतर आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.