आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताग्रस्त:पावसाची दडी, रांजणी परिसरात पिके सुकली ; शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा वाढ

रांजणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील रांजणी परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन दडी मारल्यामुळे खरीप पीके धोक्यात आली आहे. वर्ग चिंताग्रस्त आहे. सतत महिनाभर मुर पाऊस झाला होता. दैनंदिन वेळी अवेळी पाऊस असल्याने पीका मध्ये खुप तणवाढ झाली होती. तर विविध किडी, अळ्या, शंखी गोगलगाय यांनी पकड मजबूत करुन पीकाना जर्जर करून सोडले होते. किडरोगाचे निर्मुलन आणि तणवाढीचे व्यवस्थापन करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले होते. त्याबरोबर आर्थिक झळ ही सोसावी लागली. मशागतीनंतर पावसाने दढी दिल्याने शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा वाढ झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे जेमतेम पाणीसाठा आहे ते ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वगैरेंनी पाण्याचा उपभोग घेत असून पीके वाचविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांना नाइलाज असल्याने नुसती तगमग आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे पाणी साठा उपलब्ध असून विजेच्या लपंडावामुळे ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी अवस्था होत आहे. सद्यस्थिती पीके सुकून जात असून कोरडवाहू पिके माना टाकत आहेत. त्यामुळे पीक परिस्थिती खुपच विदारक आहे. येत्या तीन-चार दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप पिकांना धोका संभवतो. या वर्षी जिल्ह्यात कपाशीची लागवड जास्त असुन त्या पाठोपाठ सोयाबीन, तुर, मुग, उडीद, वगैरेचा क्रम लागतो. मात्र, खरीप ज्वारीचा पेरा सर्वात कमी आहे. फळबाग धारक धास्तावले आहे. दरम्यान, माझ्याकडे दहा एकर मोसंबी बाग आहे. दरवर्षी हवामानात बदल होत असल्याने मोसंबी बागायतदार संकटात आहेत. यंदा महिनाभर सततच्या पावसामुळे मोसंबी बागेत ओलावा राहील्याने मोठ्या प्रमाणात जवळजवळ ५० टक्के फळगळ झाली. दरवर्षी फळपीक बागायतदारांना नुकसान होते. या वर्षी मोसंबी बागायतदारांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वेठीस
या वर्षी उशिरा पाऊस झाला. मूरपाऊस झाल्याने पिके जोमदार आहेत. सतत महिनाभर मूरपाऊस झाल्याने तणवाढ आणि पिकांवर विविध रोग किडीने आक्रमण केले. त्याचा निस्तारा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली.आणि आता पावसांच्या दडीमुळे झोकात आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे येवला येथील शेतकरी रामकिसन तांगडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...