आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुसळधार:बदनापुरात मध्यरात्री मुसळधार पावसाची हजेरी, काठोकाठ भरल्या विहिरी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान  

बदनापूर, (जालना)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाजारवाहेगाव शिवारातील काही बैले, बैल गाडया व शेती उपयोगी अवजारे वाहून गेली आहेत.

तालुक्यात पावसाचा कहर सुरूच आहे. मागील आठवडयात झालेल्या अतिवृष्टीनंतर गुरुवारी (दि. 24) च्या मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाचा तडाखा बसला. या भागातील कृषी उत्पादनाला मोठा फटका झाला आहे. या भागातील फळबागा व पेर केलेले शेती वाहून गेली. तर नुकतेच लोकसहभागातून झालेले बंधारे व कटटे फुटून गेले. काही शेतकऱ्यांच्या विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. तर बाजारवाहेगाव शिवारातील काही बैले, बैल गाडया व शेती उपयोगी अवजारे वाहून गेली आहेत. 

तर सुखना, लहुकी, दुधना नदींना बारा वर्षानंतर पहिल्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. या नदीकाठच्या शेती पार खंगाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बदनापूर पाचोड रस्तावर नानेगाव येथील पूल वाहून गेल्याने हा रस्ता बंद झाला आहे. दरम्यान आमदार नारायण कुचे यांनी सकाळीच रोषणगाव सर्कलमध्ये भेट देऊन पाहणी केली असून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना समवेत घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.

बदनापूर तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीत होती. यंदा मात्र निसर्गाने तालुक्यात पावसाने कसर भरून काढण्याचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार मारा केल्यामुळे बदनापूर व अंबड तालुक्यातील सिमारेषेवर असलेले व बदनापूर शहराच्या दक्षिणेकडील रोषणगाव, मांजरगाव, धोपटेश्वर, कुसळी, बाजारवाहेगाव, चिकनगाव, नानेगाव, माहेरभायगाव, देशगवव्हान, बदापूर, सायगाव, अवा, अंतरवाला या गावात मागील आठवडयातच अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...