आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधण्यास मदत

परतूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळामुळे शरीर सदृढ आणि मन सशक्त राहते. खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबर खेळाची आवड जोपासायला हवी असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

परतूर तालुक्यातील आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयात शनिवारी विभागीय ज्यूदो व तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू सर्वेश भाले, प्राचार्य शैलेश नागदेवते, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत अंभुरे,भाजपा युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले, दिगंबर मुजमूल, प्रशांत बोनगे, क्रीडा शिक्षिका जया कंदारे यांची उपस्थिती होती.

आमदार लोणीकर म्हणाले, नवोदय विद्यालयात विविध राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे हे जाणून आगामी काळात विद्यालयासाठी नवीन इमारत, वातानुकूलित क्रीडांगण आदी विकास कामांसाठी १०० कोटी रुपये आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नवोदय विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, खेळाडू आदींची उपस्थिती होती.