आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:श्रीमती काबरा विद्यालयात केली विद्यार्थिनींची हिमोग्लाेबिन तपासणी

जालना17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती जमुनाबाई बाळाराम काबरा विद्यालय टेंभुर्णी व ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय किशोवयिन स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत तसेच भारतीय स्वातंत्र्याचा आम्रत मोहत्सव निमित्त ६१ मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

विद्यार्थीनींसाठी राबवण्यात आलेला हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर व जिल्हा सामान्य रुग्णालय जालनाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा किशोरी समन्वयक माया सुतार, ग्रामीण रुग्णालय टेम्भुर्नीचे वैद्यकीय अधीक्षक श्रीमती बाभूळगावकर मॅडम, कऊटकर साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी किशोरवयीन मुलांना व मुलींना किशोरवयीन वयात होणारे बदल, वयक्तिक स्वच्छता, पोषक आहार, वाढ व विकास, त्वचेवर होणारे आजार, ताण तणाव, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षण, असंसर्गजण्य आजार, लोहयुक्त गोळ्या , कुपोषण, हिंसा, मानसिक आरोग्य, माता व बालम्रुत्यु कमी करणे, लग्नाचे वय, विवाहपुर्व मार्गदर्शन, आयर्नच्या गोळ्या, अनेमीया, लैंगिक स्वच्छता, शिक्षणाचे महत्व, कोविड १९ आजार बद्दल व लसीकरण, कौटुंबिक हिंसाचार, लग्नपूर्व समुपदेशन, विविध होणारे आजार व त्यावरील ऊपचार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग याविषयी माहिती देण्यात आली.

या बरेाबरच बदलत्या जीवनशैली मुळे होणाऱ्या विविध आजारा विषयी माहिती दिली. तसेच तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी श्री.मल्हारी भगवान उमाप यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हिंद लॅब च्या संगीता आढावे व जयश्री उगले मुख्यध्यापक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...