आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालय पापळ येथे मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

टेंभुर्णी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व.भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय पापळ व ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय किशोवयिन स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त २९ मुलीची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.ही तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा सामान्य रुग्णालय जालनाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा किशोरी समन्वयक माया सुतार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाभूळगावकर, कऊटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी किशोरवयीन मुलांना व मुलींना किशोरवयीन वयात होणारे बदल, वयक्तिक स्वच्छता, पोषक आहार,वाढ व विकास, त्वचेवर होणारे आजार, ताण तणाव, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षण, असंसर्गजण्य आजार, लोहयुक्त गोळ्या , कुपोषण, हिंसा, मानसिक आरोग्य, माता व बालमृत्यु कमी करणे, लग्नाचे वय, विवाहपुर्व मार्गदर्शन, आयर्नच्या गोळ्या,अनेमीया, लैंगिक स्वच्छता, शिक्षणाचे महत्व, कोविड १९ आजार बद्दल व लसीकरण, कौटुंबिक हिंसाचार, लग्नपूर्व समुपदेशन, विविध होणारे आजार व त्यावरील उपचार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, याविषयी माहिती देऊन, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारा विषयी माहिती दिली. तसेच तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी मल्हारी उमाप यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...