आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहल:जागतिक वारसा सप्ताहानिमित्त अंबड शहर परिसरात काढली वारसा सहल

अंबड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक वारसा सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पुरातत्व विभाग साजरा करीत आहे. या निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकास अभिवादन करुन अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी मत्स्योदरी अंबिका देवी मंदिर निर्माण, स्थापत्य शैली, बांधकाम वर्षे, बारव निर्मिती तसेच मंदिराच्या परंपरा आदीची माहिती दिली.

नागरिकांनी गावातील मंदिर, बारव, घाट, धर्मशाळा, वीरगळ, सतीशिळा, समाध्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अशा वास्तुंना रंगरंगोटी करु नये ज्यामुळे त्यास नुकसान पोहचते असे सांगितले. यावेळी लक्ष्मण बेवले, भगवान मैंद, रामदास सागुते, अहिलाजी काळे, राजेश पारडकर, विठ्ठल मोगरे, गणेश नवले, भाऊसाहेब बारहाते, मुक्ताराम शेळके, संदीप कोल्हे, अर्जुन तायडे, अनिल भालेकर, संगीता मैंद, कविता कोल्हे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...