आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा महिलां:वीरपत्नी, विधवा महिलांसह अनाथांना मिळाला मदतीचा हात

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन मित्र मंडळाच्या वतीने कर्तृत्वान व्यक्तींच्या गौरव सोहळा माजी नगराध्यक्ष अॅड. हर्षकुमार जाधव यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला. यावेळी नामचे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते गरजूंना मदतही करण्यात आली.

यामध्ये सेनेत शहीद झालेल्यांच्या पत्नींना ११ हजारांची मदत केली. शहरातील १८ विधवा महिलांना रोजगार उपलब्धीसाठी शिलाई मशीन देण्यात आली, तर सिल्लोड तालुक्यातील वरूडच्या शेतकऱ्याची विधवा पत्नी हिला मदत म्हणून दोन लाखांची मदत करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

बातम्या आणखी आहेत...