आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील आठवडी बाजारात गेल्या तीन आठवड्यांपासून भाजीपाल्याच्या भावात मोठी तेजी आली असून सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाचे दर वधारले आहेत.
रांजणी हे घनसावंगी तालुक्यातील बाजार पेठेचे मोठे गाव असून येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारासाठी दुरुन भुसार व्यापारी, छोटे व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि परिसरातील पंधरा ते वीस गावचे ग्रामस्थ खरेदी विक्री साठी येतात. त्यामुळे येथील आठवडी बाजारात मोठी उलाढाल होते.
गेल्या तीन आठवड्या पासून भाजी पाल्याचे भावात मोठी तेजी आली असुन चवळी, भेंडी, कारले, शेपूपालक यांचे भाव किमान ऐंशी रुपये किलो तर मिरची, सफरचंद चे भाव शंभर रूपये किलो, मेथीचा दर प्रती डझन रुपये दोनशे ते अडीचशे असा होता. तसेच बटाटा, कांदा यांच्या भावात मोठी वाढ झाली असून प्रती किलो तीस ते चाळीस तर टोमॅटोचा दर साठ रुपये प्रती किलो झाला आहे. भाजीपाल्याचे चढ्या भावा बाबत भाजीपाला उत्पादक शेतकरी शिवाजी दगडूबा तांगडे यांनी सांगितले की या वर्षी दिर्घ काळ सततच्या पावसामुळे जमीनीत ओलावा टिकून राहील्याने भाजीपाल्याची सशक्त वाढ झाली नाही.
त्यामुळे हवा तसा लाग लागला नाही. परिणामी उत्पादनात घट निर्माण झाली भावात मोठी वाढ झाली आहे. भुसार बाजारात कापसाचे दर साडे आठ ते नऊ हजार रुपये तर सोयाबीनचे दर ते साडेपाच हजार प्रती क्विंटल असा होता. मागील आठवड्यात कपाशीचे दर रूपये आठ हजार तर सोयाबीनचे दर रुपये साडेचार ते पाच हजार पर प्रती क्विंटल असे होते. सद्या तरी शेतकरी गहू, हरभरा पेरणीत व्यस्त असल्याने आठवडी बाजारात किरकोळ विक्रीसाठी आवक कमी असल्याचे कापुस व्यापारी पप्पू सेठ यादव यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.