आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग:भारत जोडो यात्रेसाठी हिंगोली जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी आ. राजेश राठोड यांच्यावर

मंठा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे हिंगोली जिल्हा निरीक्षक म्हणून आमदार राजेश राठोड यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच त्यांची निवड सांस्कृतिक कार्य समितीवर देखील करण्यात आली आहे. सात नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे.

मंठा तालुक्यातून राजेश राठोड यांच्या नेतृत्वात बहुसंख्य कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रा नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा मार्गे मध्य प्रदेशात जाणार असून यात्रेचा महाराष्ट्रात १६ दिवस प्रवास असणार आहे. देशातील बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १२ राज्यातून १५० दिवस यात्रा चालणार आहे. यात्रेचा कन्याकुमारी ते श्रीनगर असा एकूण ३ हजार ५७० किलोमीटर इतका प्रवास राहणार असून भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी विविध राज्यातील जनतेशी संवाद प्रस्थापित करीत आहेत.मंठा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यासह हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या यात्रेत सहभागी होतील असे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...