आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:दाभाडीत चोरी; रोख 2 लाख, सहा लाखांचे दागिने लंपास

चिखली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील सय्यद लतीफ सय्यद जिलानी यांच्या घरात रात्री साडेबारा-एकच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील रोख दोन लाख व पाच ते सहा लाखांचे दागिने लंपास केले.

दाभाडी येथील बाजार गल्ली परिसरात सय्यद लतीफ सय्यद जिलानी यांचे घर आहे. रात्री साडेबारा-एकच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर रूमची बाहेरून कडी लावून जेथे रोख रक्कम व दागिने कपाटात होते, तेथे प्रवेश करून कपाटातील सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सात ते आठ लाखांचा ऐवज लंपास केला. सकाळी जेव्हा कुटुंबाला जाग आली तेव्हा हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा सय्यद लतीफ यांच्या मुलाने सकाळीच बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथील पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सकाळी साडेसात वाजता घटनास्थळाला भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...