आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेणुकाई मागील ५० वर्षापासून दुर्लक्षीत व धुळखात पडून असलेल्या विदर्भ व खान्देशाला जोडल्या जाणारा हिसोडा फाटा ते लेहा या तीन किलोमीटर रस्त्याचे भाग्य आमदार संतोष दानवे यांच्या पुढाकारातुन उजाळणार आहे. आमदार संतोष दानवे यांनी शनिवारी सदर रस्त्याची पाहणी करीत लेहा व हिसोडा गावातील ग्रामस्थांशी संवाद साधुन येणाऱ्या काही दिवसात तत्काळ या रस्त्यावर डाबरीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, हिसोडा फाटा ते लेहा रस्त्याला सुवर्ण महोत्सवी तपानंतर झळाळी मिळणार असल्याचे म्हणने वावगे ठरणार नाही.
भोकरदन तालुक्यातील लेहा व हिसोडा फाटा हा रस्ता ३ किलोमीटर अंतराचा आहे. दरम्यान आन्वा, जळगाव सपकाळ, हिसोडा, लेहा, शेलुद, पारध खुर्द या भागातील नागरिकांना खान्देशात व विदर्भात जाण्यासाठी हा मार्ग शाँर्टकट आहे. मात्र सदर रस्ता तब्बल १९७२ पासून तसाच पडून आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना रस्त्यावर प्रवास करताना विविध अडचणीचा सामना करावा लागत असे.
या रस्त्यावर बैलगाडी तर सोडा साधे माणसाला देखील पायी चालणे अवघड आहे. दरम्यान शेती विकासाच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्याने या रस्याचे काम करण्यात यावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने देखील सादर केली होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने अखेर शेवटी येथील शेतकऱ्यांनी एकञ येत मागील काही दिवसापुर्वी आमदार संतोष दानवे यांची भेट घेत आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. दळणवळण व शेती विकासाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असल्याने आमदार संतोष दानवे यांनी हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले होते.
त्यानुसार शनिवारी खुद्द आमदार दानवे यांनी रस्त्याची पाहणी करीत या भागातील शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरूवात करणार असल्याचे सांगितले. शिवाय या भागातील नागरिकांनी देखील रस्त्याचे काम पूर्ण झाले तर आमचे पांग फिटेल अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. या भागातील सर्वच रस्त्याची पाहणी दानवे यांनी यावेळी केली. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या रस्ता कामाला एकदमच सुरूवात होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
या पाहणी प्रसंगी माजी जिप सदस्य सुभाष देशमुख, डाॅ. हेमंत सपकाळ, बन्कु सपकाळ, भाजपा जेष्ट नेते मोतीराम नरवाडे, सरपंच अशोक सोनुने, सरपंच शरद बारोटे, रामेश्वर लक्कस, संग्रामसिग राजपुत, विजयसिंग राजपुत. बाबुराव बेराड, हरिभाऊ आहेर, अजय देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, रामेश्वर देशमुख आदींची उपस्थिती होती. पावसाळ्यात या रस्त्यावर चालताना शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातुन प्रवास करावा लागत होता. तसेच हा रस्ता खडतर असल्याने अनेक वेळा या रस्त्यावर अपघात देखील घडले आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.