आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साफसफाई:पिंपळगाव रेणुकाई येथील ऐतिहासिक बारव चकाचक; गणेश मंडळाकडून साफसफाई

पिंपळगाव रेणुकाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील ऐतिहासिक बारवेला १८५ वर्षांचा जुना इतिहास आहे. मात्र या बारवेत आजूबाजूला मोठी घाण साचली होती. त्यामुळे गावाचे वैभव म्हणून ओळख असणाऱ्या ऐतिहासिक बारवेची येथील गणेश मंडळांनी एकञ येत सार्वजनिक परिश्रम घेत मागील काही दिवसांपूर्वी साफसफाई केली आहे. त्यामुळे बारवेला चकाकी मिळाली आहे. शिवाय या बारवेचे पुनर्वसन व्हावे म्हणून मंडळातील सदस्य पुरातन विभागाकडेदेखील मागणी करणार असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे रेणुकामातेच्या मंदिराला लागूनच १८५ वर्षांपूर्वीचा भव्य असा ऐतिहासिक बारव आहे. या बारवेला मोठी अाख्यायिका आहे. या बारवेत पूर्वी रेणुकामाता सकाळीच स्नान करण्यासाठी जात असे असे गावातील जुने जानकार आजही सांगतात. पंरतु बऱ्याच वर्षांपासून बारवेकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे तसेच पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने या बारवेची मोठी दुरवस्था झाली आहे.हा बारव सध्या नामशेष होण्याचा मार्गावर आहे. परंतु गावातील अनमोल ठेवा नामशेष होण्यापासून वाचला पाहिजे याचे जतन झाले पाहिजे यासाठी गावातील ओम गणेश मंडळ, राजमुद्रा गणेश मंडळ, स्वराज गणेश मंडळातील सदस्यांनी गणेश उत्सावाच्या तोंडावर एकत्र येत रेणुकामातेच्या ऐतिहासिक बारवेचा, साफसफाईचा संकल्प करीत बारवेत ठिकठिकाणी साचलेला घाण कचरा’ गवत, झाडेझुडपे सार्वजनिक परिश्रमातून नष्ट केली आहे. त्यामुळे हा बारव सध्या चकाचक दिसू लागला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे गणेश भक्तांना आनंद साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी सगळीकडे मोठ्या उत्साहाने गणेशोत्वस साजरा केला जाणार आहे.

अनेक मंडळाकडून आतापासुनच डिजेच्या तयारीत बापाला आगमन व दहा दिवसांनंतर विसर्जन करण्याची तयारी सुरू आहे. माञ येथील गणेश मंडळ पारंपरिक वाद्यात बाप्पाचा उत्सव साजरा करणार आहे. शिवाय गपणती उत्सवाच्या तोडांवरच हा साफसफाईचा सामाजिक कार्यक्रम येथील गणेश मंडळानी हाती घेऊन गावातील ऐतिहासिक ठेवा वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे या गणेश मंडळातील सदस्यांचे सर्वञ कौतुक होत आहे. यासाठी शेखर देशमुख,भूषण देशमुख, रोहित देशमुख, संदीप लहाणे, कुणाल देशमुख, सुयोग देशमुख, गोपाल देशमुख, शुभम देशमुख, संतोष देशमुख, बंडू देशमुख, उद्धव देशमुख, राजू देशमुख, बबलू देशमुख, कपिल देशमुख, प्रविण देशमुख, उमेश देशमुख, चेतन देशमुख, सुनील देशमुख, अमोल देशमुख, रवी देशमुख, मंगेश देशमुख, मयुर राव, ज्ञानेश्वर देशमुख, पवन देशमुख, रामेश्वर देशमुख, सोनू लहाने, नितीन देशमुख, अभिजित देशमुख, सोनू देशमुख, शरद जाधव, मनोज देशमुख, शिवाजी देशमुख, पवन देशमुख, ज्ञानू पवार, स्वप्निल देशमख, आकाश गाढे, गजानन देशमुख, जय गाढे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...