आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिर:ब्रेकऐवजी एक्सिलरेटर दाबले, भरधाव कार कोसळली रस्त्याच्या बाजूच्या विहिरीत

देऊळगावराजा/ भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक अमोल मुरकूट हे पत्नीला कार शिकवत होते. या वेळी समोरील वाहनाने कट मारला. त्यामुळे घाबरलेल्या पत्नीने ब्रेक मारण्याऐवजी चुकीने एक्सिलरेटर दाबलेे. त्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत जाउन कोसळली. या घटनेत पत्नीसह मुलीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला. तसेच याच घटनेत क्रेनला हूक अडकवण्याच्या प्रयत्नात एका सव्वीस वर्षीय युवकाचा त्याच विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा शहरातील रामनगर परिसरातील चिखली बायपासजवळ घडली.

देऊळगावराजा येथे रामनगर कॉलनीत शिक्षक अमोल मुरकूट हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून ते भोकरदन तालुक्यातील नळणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ते व त्यांची पत्नी स्वाती मुरकूट तसेच बारा वर्षीय मुलगी सिद्धी हे तिघे कारने प्रवास करत होते. या वेळी त्यांच्या पत्नी कार शिकत होत्या.

रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या वाहनाने त्यांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे पत्नीचे वाहनावरील नियंत्रण सुटले. घाबरलेल्या पत्नीने ब्रेक मारण्याऐवजी त्यांच्याकडून चुकीने एक्सिलरेटर दाबले गेले. त्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी ग्रामस्थांना गंभीर जखमी झालेल्या शिक्षक मुरकूट यांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. परंतु या घटनेत त्यांची पत्नी स्वाती व मुलगी सिद्धीचा मृत्यू झाला. मुलगा शाळेत गेल्यामुळे ताे बचावला.

वाचवणाऱ्या पवनच्या कुटुंबावरही आघात
देऊळगावराजा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील पवन पिंपळे (२६) हा पानटपरी व्यावसायिक आहे. त्याच्यासमोर ही घटना घडल्यानंतर त्याने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र तो एकदा खाली गेला पुन्हा वर आलाच नाही. त्याच्या कुटुंबावर हा मोठा आघात झाला आहे. कारण या कुटुंबातील तो एकटाच होता.

बातम्या आणखी आहेत...