आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपदेश:तक्षशिला बुद्धविहारात धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनी पंचरंगी ध्वजारोहण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील समर्थनगर येथे ५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पंचरंगी ध्वजारोहण प्रा. डॉ. राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. राजकुमार म्हस्के यांनी डॉ.बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म हा विज्ञानवादी, सत्य, अहिसा यावर आधारित आहे.धम्माचे नेतृत्व आपल्याला दिलेले आहे.धम्माचे पालन केल्यास जीवन खुप सुंदर होईल, असा उपदेश त्यांनी या प्रसंगी केला.

कार्यक्रमासाठी उपासक भिकाजी साळवे प्रा. संभाजी कांबळ, शरणागत, ॲड. राजेंद्र साळवे, बी. के. बोर्डे, सुधीर खंडारे, संदिप इंगोले, मालती गायकवाड, नलिनी खंडारे, अशोक गंगावणे, सयाबई साळवे, रवींद्र साळवे, संजय पगारे , रामकिसन अंभोरे. पडीभार , झिने ग्रामसेवक, संतोष मगरे , बाबुलाल बडोले, सुप्रिया बगळे, सुधाकर दाभाडे, कोंडीराम पवार इत्यादी उपासक उपस्थित होते. यावेळी जालना शहरातील उपासक - उपासिका यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी बौध्द विहारात हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...