आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन साजरा:जाफराबादेत स्वच्छता करून होमगार्ड वर्धापन दिन साजरा

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद शहरातील पोलिस स्टेशन येथे होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रॅलीसह स्वच्छताही मोहीमही राबविण्यात आली.

पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, जिल्हा कार्यालयीन अधिकारी दिपक भोई, नरेंद्र ठाकुर, बदाडे, सोपान टेपले यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पथकातील समादेशक अधिकारी सुनिल छडीदार यांनी ७६ वा होमगार्ड वर्धापन दिन आनंदाने साजरा केला.

यावेळी होमगार्ड कर्मचाऱ्यांची मोठी रॅली काढण्यात आली होती. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजार पेठ, मेनरोड, बसस्थानक परीसर, यासह शहरातील विविध भागात नेण्यात आली. यावेळी विविध कवायती संचालन करण्यात येवुन होमगार्ड कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परीसर, मेन रोड, पोलिस स्टेशन परीसरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी झाडे लावा झाडे जगवा, आपला परीसर स्वच्छ ठेवा, आपले गाव विकासासाठी एकमेकांना सहकार्य करा, पाणी आडवा पाणी जिरवा, बेटी बचाओ, बेटी पढाओ, यासह विविध विकासात्मक बाबींचा संदेश दिला.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी, प्रल्हाद मदन, विजय तडवी, सखाहरी तडवी, रामभाऊ छडीदार, एम.वाय, उखर्डे, के.एच.बन्सवाल, पी.पी.पाबळे, एस.डी.गोफणे,एम.आर.कुमकर,बी.ए.जमधडे,यु.एस.आढावे, एस.बी.जाधव आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...