आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण:कृष्णा आरगडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जुने पोस्ट ऑफिस रोडवरील रहिवासी, परतूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक कृष्णा तुळशीराम आरगडे यांना नुकतेच समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जालना परीट धोबी समाजाच्या वतीने हा पुरस्कार मंगळवारी जालना येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवऱ्यांच्या वतीने आरगडे यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी जालना परीट समाजाचे जेष्ठ पदाधिकारी हिरालाल इंगळे, उदय शिंदे, सुभाष वाघमारे, मोहन इंगळे, किशोर आगळे, सचिन शिंदे, सुभाष घोडके, संतोष शिंदे, मंगेश इंगळे, राहुल वाघमारे, नकुल राऊत, दत्ता घोडके, विवेक पाटील, शंकर काळे, बळिराम मोरे, मनीष जाधव, महेश मेहूनकर, दत्ता जाधव, गोपी काळे, संदीप वाघ, प्रविण डुकरे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...