आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिक्षकदिनी माजी प्राचार्यांकडून टेंभुर्णीत ४९ शिक्षकांचा गौरव; जे.बी. के. विद्यालयातील स्तुत्य उपक्रम

टेंभूर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नवभारत महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य मधुकर निकम यांनी शिक्षक दिनी आपल्या प्रशालेतील ४९ शिक्षकांचा गौरव करून शिक्षकांना आगळीवेगळी भेट दिली. शाळेतून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण निवृत्तीचे जीवन जगतात. परंतु ज्या विद्यालयात आपण जीवनातील सर्वाधिक काळ अध्यापन व्यवस्थापनात घातला, त्या शाळेतील आपल्या सहकाऱ्यांच्या प्रति असलेली सद्भावना व्यक्त करण्यासाठी येथील माजी प्राचार्य तथा नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक मधुकर निकम यांनी शिक्षक दिनी आगळावेगळा उपक्रम राबविला. आपल्या सहकाऱ्यांचा गौरव करण्याचा हेतू त्यांच्या मनी आल्याने त्यांनी शाळेत असलेल्या सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनी गौरविले. अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर होते.

प्रमुख पाहुणे म्हणून गौतम म्हस्के, प्राचार्य भास्कर चेके, माजी मुख्याध्यापक.विजय वायाळ, अंकुश वाघमोडे, लक्ष्मीकांत बुकदाने, राम देव, शेषराव मुळे, दिलीप उबरहंडे, कडुबा गाडेकर, उपमुख्याध्यापक नंदकुमार काळे, उपप्राचार्य मधुकर झटे, पर्यवेक्षक पंजाबराव सोळंके, संचालक प्रा. दत्ता देशमुख, संचालक विष्णू सांगुळे, संजय कुलकर्णी, गणेश सावसक्के, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. बोरकर यांनी तर प्रा.अरुण आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय पुराणे, संजय कुलकर्णी, प्रा. सुनील बनसोडे, प्रा. कैलास जाधव, प्रा. रामदास भांगे, दिनकर ससाणे, दत्ता उखर्डे, विष्णू जाधव, रमेश इंगळे, कैलास भुतेकर, वासुदेव क्षीरसागर, रविंद्र मोरे, राजेश शेवाळे, प्रा.गजानन धोटे, राजेंद्र जगताप, एफ. ए. शेख, उज्ज्वला आवटी, मंजूषा भिलावेकर, ज्योती जाधव, सुनील सकुंडे, विजया शिल्लार, राजुभाऊ डोमळे, अझहर सय्यद, विश्वास लव्हटे, दगडुबा तांबेकर, नागोराव देशमुख, प्रताप नवले यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...