आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड तालुक्यातील दुनगाव येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील ७५ वर्षांच्या जेष्ठ नागरिकांना गौरविण्यात आले. यावेळी दर्गाचे मियाँ साहेब म्हणाले, सर्वांनी जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला पाहिजे.त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांची वेळोवेळी विचारपूस केली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या समस्या आहेत.त्या दूर केल्या पाहिजे. हे करताना शक्यतो जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाला कल्याण जायभाये, राम जायभाये, भागवत जायभाये, माजी उपजिल्हाधिकारी दिनकर जायभाये, मुक्ती साहेब यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन विश्वंभर भुसारे यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच रहीम पठाण, उपसरपंच नकुल जायभाये, मदन जायभाये, राजू छल्लारे, अजय मासुळे, धर्मा जायभाये, राजू जायभाये, सुरेश मुंडे, योगेश जायभाये, भगवान जायभाये, शिवाजी कोल्हे, उमेश मुंडे, मुजीब पटेल, हसन पठाण, अंबादास केकान, श्याम खरे, भाऊसाहेब शिरसाठ, तुषार मुंडे, राहुल जायभाये, जितेंद्र शेळके, प्रभाकर पाटोळे, बबन जायभाये, जॉन्सन हंगारगे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.