आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:गुणवंतांचा सत्कार म्हणजे, नवीन यशासाठी प्रोत्साहन; निलेश चव्हाण यांचे प्रतिपादन

टेंभुर्णी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कठोर परिश्रम अन मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांचा सत्कार करणे म्हणजेच त्यांना पुढील आव्हाने पेलुन यश मिळवण्यासाठी मोठी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन निलेश चव्हाण यांनी केले.

येथील संकल्प सायन्स अकॅडमी मध्ये १९ जून रोजी १० वी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप मिळाली, तर आणखी मोठी झेप घेण्यासाठी मनाला एक वेगळीच उभारी येते. अशाच प्रकारचा कौतुक सोहळा संकल्प अकॅडमी मध्ये संपन्न झाला. सलग पाच वर्षाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष प्रा. डॉ. मोगले, प्रमुख पाहुणे निलेश चव्हाण, प्रा. अंकुश सोनवणे, प्रा. मुकुंद कुलकर्णी अकॅडमी चे संचालक प्रा. शंकर वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल स्मृतिचिन्ह व पुषपगुच्छ देऊन सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी पालकवर्ग, शिक्षवृंद आदींनी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहाने कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...