आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षणाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि एक चांगला माणूस घडायचा असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंदेवाडीचे सरपंच सर्जेराव शिंदे, उपसरपंच परमेश्वर नामदे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान अंभोरे, प्रमोद वाघमारे, राहुल गवारे, लक्ष्मण मोरे, जिजा रांधवन, सुमित वाघमारे, पुरोहित, दीपक वैद्य, छगन जाधव आदींची उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले, नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मुलांचे सर्वच लाड पुरवायचे नाहीत, प्रसंगी नकार पण देता आला पाहिजे, ज्याप्रमाणे जिजामाताने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना घडवले त्याप्रमाणे तुम्ही स्वतः जिजामाता बनवून मुलांना घडवले पाहिजे. त्यांना चांगले संस्कार दिले गेले पाहिजे. येणारे आव्हान त्यांना पेलण्याची त्यांच्यात ताकद निर्माण केली पाहिजे, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन सुनील ढाकरगे, सविता गायकवाड यांनी तर एस. यु. गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी ज्योती गायकवाड, शारदा माळवदे, सीमा मराठे, विशाखा बोधे, शिवानी गायकवाड, राम गोरे, अर्जुन बहुले, मंदा पाटोळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.