आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा:"समाजभान’च्या सेवेतून शंभरावर शिबिरे, राज्यभरात तीन हजार रक्तदात्यांचे जाळे

अंबड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, समाजभानच्या शिबिरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि समाजभानच्या वतीने मराठवाड्यात रक्तदान पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान पंधरवड्यातील आठवे रक्तदान शिबिर अंबड येथे उत्साहात पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान, समाजभानच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल ११४ शिबिरे घेण्यात आली असून ३ हजार ३०० रक्तदाते राज्यभरात जोडले गेले आहेत.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार संतोष सांबरे होते. या वेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा समन्वयक दादासाहेब थेटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाची एकूण माहिती सांगितली. तसेच उपस्थितांना या सेवाकार्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाउलबुद्धे, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, हनुमान धांडे, अशोक बर्डे, संभाजी चोथे, विनायक चोथे, अमोल ठाकूर, भरत सांबरे यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक करून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा समन्वयक राम इंगळे, तालुका समन्वयक गणेश मिरकड, शहर समन्वयक बाबू लांडे यांनी मेहनत घेतली. रवी इंगळे, अमोल ठाकूर, बाळासाहेब इंगळे, दत्ता शिराळे, सोपान पाष्टे, संतोष जिगे, शिवाजी बजाज, अशोक शिंदे, संदीप सातपुते, विजय शेळके, मारुती घुगे, अमोल भानुसे यांनी सहकार्य केले.

दादासाहेब थेटे यांचे ५० वे रक्तदान, पेढ्यांच्या माध्यमातून ११४ शिबिरांचे यशस्वी आयोजन समाजभानचे दादासाहेब थेटे यांनी पहिले रक्तदान पुण्यात केले. रक्तदानासाठी कुणी बोलावण्याची कधीच आवश्यकता वाटली नाही. हा प्रवास ५० रक्तदानापर्यंत येऊन पोहोचल्याचा आनंद झाला. रक्तदान ही चळवळ बनावी हे वाक्य दादासाहेब थेटेंच्या मनात घर करून बसले आणि ठरवले, आता केवळ रक्तदान करायचे नाही तर रक्तदात्यांची फळी तयार करायची आणि तिथून सुरू झाला रक्तदान शिबिर घेण्याचा प्रवास. पुढे विविध पेढ्यांच्या माध्यमातून ११४ शिबिरांचे यशस्वी आयोजन केले. आज जिल्हा व जिल्ह्याबाहेर समाजभानच्या माध्यमातून जवळपास ३३०० रक्तदात्यांची फळी तयार झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...