आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून:पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला पोलिस कोठडी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीचा खून करणारा पती किशोर हिंमतराव आटोळे (४५ रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली. जि. बुलडाणा) यास न्यायालयाने शनिवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

जुना जालन्यातील शंकरनगर भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या किशोर आटोळे याने गुरुवारी रात्रीला पत्नी इंदुबाई आटोळे (४२) हिचा खून केला होता. त्यानंतर तो घराला बाहेरून कडी लावून फरार झाला होता. या प्रकरणी मृत इंदुबाई यांची याच भागात राहणारी बहीण प्रतिभा आटोळे हिच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, कदीम जालना पोलिसांनी संशयित किशोर आटोळे यास शुक्रवारी जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...