आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप घेण्या-देण्याचीच जबाबदारी:मी तर मुख्यमंत्री आणि पीडित जनतेतील पूल : खोतकर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी महिनाभरापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, ही त्यांच्या समर्थकांची अपेक्षा मावळत आहे. कारण सध्या ते फक्त मुख्यमंत्र्यांचे निरोप घेण्या-देण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे समर्थकांमध्ये निराशा वाढत आहे. पण मी तर मुख्यमंत्री आणि जनतेतील पुलाचे काम करत आहे’ असे खोतकरांचे म्हणणे आहे. ३१ जुलै रोजी खोतकरांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद देण्यात आले. त्यामुळे त्या पुढील काळात त्यांची मंत्रिपदाकडे वाटचाल निश्चित असल्याचे म्हटले जात होते.

मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क
खोतकर यांनी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या भांबेरीच्या (ता. अंबड) ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांशी थेट बोलणे करून दिले. जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणातही ग्रामस्थ व मंदिरातील पुजाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद घडवून आणला. यामुळे मंत्रिपदाची क्षमता असलेल्या नेत्याचा वापर फक्त निरोप घेऊन पोहोचवण्यासाठी होत असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...