आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्काऊट गाइडद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्ये रुजवावीत

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे कृतीयुक्त शिक्षण देण्याचे नियोजन करावे. तसेच चारित्र्यसंवर्धन, आरोग्य संवर्धन, स्वावलंबन व सेवा ही आदर्श मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवून देशाचा सर्वगुणसंपन्न भावी नागरिक स्काऊट गाईडच्या माध्यमातून घडवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जालना भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात भारत स्काऊट गाईड स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य आयुक्त गाईड शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची उपस्थिती होती.

तर जिल्हा परिषदेत जिप च्या सिईआे वर्षा मीना, आयुक्त गाईड तथा शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्यासह स्काऊट गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना स्काऊट गाईड ध्वज स्टिकर प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा आयुक्त तथा गटशिक्षणाधिकारी भारत वानखेडे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड अख्तर जहाँ कुरैशी, जिल्हा संघटक स्काऊट के. एल. पवार, जिल्हा संघटक गाईड सोनिया शिरसाट, ज्येष्ठ स्काऊट मास्टर रमेश भागवत, प्रशांत हरकळ, विकास सोनवणे, गाईड कॅप्टन सुमन सुतार, कार्यालयीन कर्मचारी रमेश वारे, साईनाथ ठक्कूरवार तसेच ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल या शाळेतील गाईड शेख बुशरा शेख हसीन, नेहा लोधवाल, स्काऊट महेश कवडी, पल्लव कुलकर्णी, प्रणव नाईक, सुरेखा प्राथमिक शाळा जालना या शाळेतील स्काऊट कार्तिक कोमटवार, बालाजी मोरवाल, राजवीर घाटगे, साईनाथ पवार, श्री. शिवाजी हायस्कूल जालना या शाळेतील गाईड साक्षी भास्कर लोखंडे, राधिका एकनाथ वाघमारे, गौरी गोविंदसा पैंजणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्तावना के. एल. पवार यांनी केली .

स्काऊट गाइड उपक्रम प्रभावीपणे राबवू
विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद शाळेत स्काऊट गाईड उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान तसेच शिस्त लावण्याचे काम या चळवळीतून केल जाते. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवला जावा, यासाठी या शैक्षणिक वर्षात प्रयत्न केले जातील, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...