आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मूर्ती तपास : एलसीबी अधिकाऱ्यांचा सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या पूजेतील पंचायत यांच्या मूर्ती चोरणाऱ्या सर्व आरोपींना जेरबंद करून मुर्ती हस्तगत केल्याबद्दल विष्णू पाचफुले मित्र मंडळ आणि फ्लेक्स जिमच्या वतीने पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात येऊन चोरीचा छडा लावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग आणि त्यांच्या टीमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले म्हणाले की, जांबसमर्थ येथील मूर्ती चोरीस जाणे म्हणजे हिंदू समाजाच्या अस्थेला ठेच पोहोचविणारे कृत्य होते. जिल्हा पोलिसांनी सर्वत्र तपास करूनही यश नव्हते. अखेर पर राज्यात शोध मोहीम राबवून मोठ्या प्रयत्नाने आरोपींना जेरबंद करण्याबरोबरच सर्व मुर्त्या हस्तगत केल्याने आनंदाचे वातावरण आहे.

ही कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे. सदर प्रकरणातील आरोपींनी मागे कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता.त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. यावेळी विष्णू पाचफुले यांच्यासह नाना आर्दड, योगेश उजवणे, डॉ. इंगळे, अॅड. मोरे, उद्योजक रामदास काकडे, रामचरण, मोहन क्षीरसागर, लोकेश चौधरी,रोहिदास आर्दड, निकाळजे, वेंकी, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...