आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांचा इशारा:जाहीर माफी मागितली नाही तर  राज्यपालांचे कार्यक्रम हाणून पाडू

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे स्पष्टीकरण न देता देशाच्या गृहमंत्र्यांकडे हे स्पष्टीकरण दिले असून ते नियमबाह्य आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी न मागितल्यास मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षांच्या वतीने सनदशीर मार्गाने त्यांचे कार्यक्रम हाणून पाडले जातील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भाग्यनगर येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जगन्नाथ काकडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख मेहमूद आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. लाखे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांच्या अवमानप्रकरणी देशाचे गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्याकडे स्पष्टीकरण दिले. मुळात राज्यपालांनी हे स्पष्टीकरण घटनेच्या कलम १५६ नुसार राष्ट्रपतींकडे पाठवणे अभिप्रेत होते. गृहमंत्र्यांकडे स्पष्टीकरण पाठवून राज्यपालांनी चुकीचा पायंडा पाडला.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदनही देण्यात आले. निवेदनावर माजी मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, संजय लाखे पाटील, सुधाकर निकाळजे आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...