आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • If Skills And Confidence Are Strong, You Can Win Places; Principal Dr. Proposition By Ganesh Agnihotri; The Entire Brahmin Community Felicitated The Meritorious| Marathi News

दिव्य मराठी विशेष:कौशल्य, आत्मविश्वास प्रबळ असेल तर जगही जिंकता येते;प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांचे प्रतिपादन; समस्त ब्राह्मण समाजातर्फे गुणवंतांचा केला सत्कार

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणांच्या आकड्याने आलेला टक्केवारीचा हिशेब पोकळच असतो. स्पर्धेत उतरायचे तर जिद्द, मेहनत करण्याची अदम्य इच्छा स्वत:मध्ये असली पाहिजे. कौशल्य आणि आत्मविश्वास प्रबळ असेल तर जगही जिंकता येते, असे प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री यांनी सांगितले.

जुना जालन्यातील स्वयंवर मंगल कार्यालयात समस्त ब्राह्मण समाजातर्फे आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर अॅड. सुनील किनगावकर, विलास नाईक, विनायक महाराज फुलंब्रीकर, डॉ. प्रकाश शिगेदार, सिध्दीविनायक मुळे, स्वाती कुलकर्णी, शालीनी पुराणिक यांची उपस्थिती होती. प्रारंभी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात दहावी, बारावी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, संगीत, आयआयटी मध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सन्मानचिन्ह, गौरवपत्र देवून करण्यात आला.

डॉ. अग्निहोत्री म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात गुणवत्तेऐवजी टक्केवारीचा विचार होतो हे चुकीचे आहे. टक्केवारीच्या प्रभावाने खरी गुणवत्ता हरवत चालली आहे. सकारात्मक विचार, ध्येय निश्चित करून वाटचाल करताना जिद्द,अपार मेहनत असल्यास यशाला गवसणी घालता येते. विलास नाईक यांनी ब्राह्मण समाजातील वास्तव प्रश्नाचा गांभीर्यपूर्वक विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ब्राह्मण समाजावर नाहक बदनामीकारक होणारी टीका,सोशल मिडीयावर व्हायरल होणारा मजकूर अशा घटनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे आर.आर.जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमात सुरेश मुळे, विनायक महाराज फुलंब्रीकर, सुनील किनगावकर यांनी आपल्या भाषणातून समाजातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रास्ताविक संयोजक दीपक रणनवरे यांनी केले. सूत्रसंचालन संजय देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास अनंत वाघमारे, दिलीप देशपांडे, पी. जी. देशपांडे, नरेश महाजन, शशिकांत दाभाडकर, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मधुसूदन दंडारे, ॲड. विनोद कुलकर्णी, अॅड. सुबोध किनगावकर, अमोल मोहरीर, आनंदी अय्यर, अपर्णा राजे, सीमा सरपोतदार, प्रतीभा खांडे, सुजाता कुलकर्णी, रुचिता शेवलीकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...