आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड जर १५ दिवसांच्या आत भरला नाही तर संबंधित वाहनधारकांवर न्यायालयात खटले दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, आजपर्यंत वाहतूक शाखेने १२० वाहनांवर न्यायालयात खटले दाखल केले आहे.
अनेक वाहनचालक वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्यांना ई-चलनाद्वारे दंड आकारतात. याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर पाठवल्या जाताे. संबंधित वाहनधारकाने १५ दिवसांच्या आत हा दंड भरणे बंधनकारक आहे. परंतु, अनेकजण दंड भरण्याकडे कानाडोळा करतात. त्यांना लोक अदालतीमध्ये बोलावण्यात येते. परंतु, काही जण तेथेही दंड भरत नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटले दाखल करणाऱ्याची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत जवळपास १२० वाहनांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहे.
महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करा
प्रत्येक वाहनधारकांनी आपल्या मोबाइलमध्ये महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून घ्यावे, त्यात वाहनाचा नंबर टाकून आपल्या वाहनावर किती दंड आहे, याची माहिती मिळते. ज्या वाहनांवर दंड आहे, त्यांनी वाहतूक शाखा किंवा चौकात उभा असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याकडे दंड भरावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.