आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:चुकीच्या लोकांच्या हातात गावची सत्ता गेली तर गावाचा सत्यानाश

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील जनता ही देश विकासाचा कणा आहे. यासाठी ज्याच्या हाती गावची दोरी तो गावचा विकास करी. हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन ग्रामीण भागातील जनतेने गावातील सत्ताकारण करण्यासाठी हुशार आणि काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहीजे. कारण चुकींच्या लोकांच्या हातात गावाची सत्ता गेली तर गावाचा संपूर्ण सत्यनाश होतो. गावाचा सत्यनाश झाला तर गावाचे देखील महत्त्व राजकीय पातळीवर कमी होत असल्याचे प्रतिपादन पाटोदा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्कराव पेरे पाटील यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने सावंगी रत्न पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व बँकैचे विभागीय सदस्य सतीष गुप्त यांची उपस्थिती होती. पेरे म्हणाले, अवघडराव सांवगी सारख्या एका खेड्या गावात रत्नाची खान आहे. आज गावातील रत्नांना हा पुरस्कार माझ्या हाताने दिला जात असल्याचा मला अभिमान आहे. या रत्नांचा आदर्श निश्चितच भावी पिढीला होणार आहे. गावचा सरपंच हुशार असला की गावचा विकास होत असतो.

यासाठी गावाची सत्ता चांगल्या आणि हुशार तसेच विकासाची जाण असलेल्या लोकांकडे द्या तरच गावचे भले होईल नाही तर गावाचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही. वृक्षाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की कोरोना काळात आँक्सिजन अभावी अनेकांना आपला जिव गमवावा लागला.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले.ज्या ठिकाणी वृक्षाची संख्या कमी होती.त्या ठिकाणी मृत्यूचे प्रमाण देखील अधीक होते. मनुष्याच्या जीवनात वृक्षाचे अतिशय महत्त्व आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवून वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. हास्यजञा फ्रेमचे प्रकाश भागवतने उपस्थितीना मनसोक्त हसवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच अब्दुल सत्तार बागवान, उपसरपंच अंकुश काकडे, प्रकाश पाटील यांच्यासह धाड, पारध, पिपंळगाव रेणुकाई, मोहळाई, लेहा, कोसगाव, जाफराबाद, भोकरदन, अकोला, बुलढाणा, चिखली औरंगाबाद, जालना आदी ठिकाणचे व्यावसायिक, शेतकरी उपस्थित होते.

गाव हागणदारीमुक्त करा
आज देश बदलत चालला आहे. यासाठी प्रत्येकाने किमान आपल्यासाठी नाही पण आपल्या आई बहीणीसाठी तरी स्वच्छतागृह बांधावे आणि गाव हागणदारी मुक्त करुन गावाची स्वच्छता अबाधीत ठेवण्याचे आवाहन देखील पेरे पाटलानी दिले.अवघडराव सावंगी येथे झालेली विविध विकास कामे व गावाच्या मुख्य रस्त्यावर वाढी लागलेले डोलदार वृक्ष पाहुन समाधान व्यक्त केले.

पैसे घेऊन मतदान करू नका
आज समाजात निवडणूकीच्या काळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चुकीचे पुढारी दोन पैशासाठी तुम्ही निवडून देतात. माञ तुम्हाला नंतर तुमचे काम करुन घेता येत नाही. कारण तुम्ही निवडणूकीच्या काळात स्वतः ला विकलले असतात. यासाठी दोन पैशासाठी स्वतःचा स्वाभिमान विकू नका याचे परिणाम आपल्या भावी पिढीला भोगावे लागतील याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे पेरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...