आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:गणेश विसर्जनापर्यंत मूर्तींच्या चोरीचा तपास न लावल्यास ठिय्या आंदोलन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार कैलास गोरंट्याल यांनी शुक्रवारी (२ सप्टेंबर) समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांबसमर्थला भेट दिली. मंदिरातून पुरातन मूर्तीच्या चाेरीचा तपास श्री विसर्जनापर्यंत लावावा, अन्यथा जालन्यात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

जांबसमर्थ येथील मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पुरातन पंचधातूच्या मूर्तीची चोरी होणे ही गंभीर बाब आहे. श्री विसर्जनापर्यंत प्रशासनास तपास करण्यास यश आले नाही तर जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा आ. गोरंट्याल यांनी दिला. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणेद्वारे तपासणी होऊन आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, संस्थानचे पुजारी धनंजय देशपांडे यांच्याशीही आ. गोरंट्याल यांनी घटनेविषयी विस्तृत चर्चा केली. या वेळी बाबासाहेब तांगडे, डॉ. विलास तांगडे, संजय तांगडे, राजकुमार वायदळ, गोपाल तांगडे, अशोक देवकर, रामेश्वर तांगडे, जगन देवकर, सचिन जोशी, दत्ता घुले, अरुण घडलिंग, योगेश पाटील, गणेश चौधरी, महेश तांगडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...