आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त विधान:पुन्हा वादग्रस्त विधान केल्यास महाराष्ट्र पेटेल : मराठा महासंघ

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. यापुढे अशी विधाने केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मराठा महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश जगताप यांनी दिला.

सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर रविवारी राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ॲड. अर्जुन राऊत पाटील यांनी घटनात्मक पदावर असलेल्या राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांना वादग्रस्त विधान शोभत नसून राष्ट्रपतींनी राज्यपालांचा राजीनामा घ्यावा, नसता आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा ॲड. अर्जुन राऊत यांनी दिला. आंदोलनात रोहित देशमुख, किरण देशमुख, करण जाधव, शुभम शिंदे, अक्षय मोरे, शुभम राजगिरे, गोविंद हुंबे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...