आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनुष्याच्या जीवनात मन, मस्तक व मनगट या तीन बाबी मजबूत असेल तर आवश्यक त्या सर्व गोष्टी आपोआप प्राप्त होतात. तर पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांच्या अहंकारामुळे मिळालेले सगळे हातातून जात असल्याचे निरूपण ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे संत गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनात महाराजांनी अनेक दृष्टांत देऊन हरिनाम भक्तीचे महत्त्व विशद केले. शिवाय जीवनामध्ये राजकारण शिकायचे असेल तर श्रीकृष्णाकडुन शिकावे परंतु केवळ खुर्चीसाठी राजकारण न करता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राजकारण केले पाहीजे. राजकारणामध्ये सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो असे राजकारणाचे तत्व आहे. राजकारण जीवनाचा अविभाज्य भाग असून त्यापासून आपल्याला दूर जाता येत नाही.
असे असले तरी नैतिक दृष्टिकोन शाबुत ठेवावा. राजकारणात चढ-उतार येत असतात परंतु आपण आपले ध्येय निश्चित ठेवले तर एक दिवस आपलाच विजय होतो. दरम्यान वाढत्या मोबाईलचा वापर बघता जीवनामध्ये मोबाईलचा वापर कमी असणारे सुखी आहेत. या जगामध्ये कुणाला कुणाशी देणेघेणे नाही. यामुळे सर्वांशी प्रेमाने वागावे. महिलांनी भारतीय संस्कृती अंगीकारून अंगभर कपडे घालावे. भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव हा जगावर पडत असुन परदेशातील महिला अंगावरचे दागीने काढुन तुळशीच्या माळा घालत आहे. भारत हा माझा देश आहे याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. बरेच लोक स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. यामुळे माणसे खालच्या थरावर आली आहेत.
जे जे आपल्याकडे चांगले आहे ते दुसऱ्यांना सांगितले पाहीजे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे असे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. लोक आळशी झाल्याने आजार वाढले आहेत. जुनी जाणती मंडळी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायचे व रात्री उशिरापर्यंत कष्ट घ्यायचे त्यामुळे त्यांची शरीर प्रकृती ही तंदुरूस्त असायची. एकंदरीत जीवनामध्ये दुःख आले तरी त्याचा खेद न बाळगता त्याला सामोरे जाण्यातच शहाणपण आहे.
माणसाने जगाच्या नजरेतून उतरणे पेक्षा स्वतःच्या नजरेतून उतरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करून शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे सांगीतले. यावेळी शिवाजी महाराज काकडे, ज्ञानेश्वर पालकर, सुरेश पालकर, सरपंच सांडू पालकर, माजी सरपंच भागवत पालकर, दिलीप पालकर, विष्णू पालकर, उत्तमराव पालकर, पुरुषोत्तम पालकर, सखाराम पालकर, बालाजी पालकर, इंजि विनायक पालकर, गणेश बडक, श्रीराम शिंदे, पंढरीनाथ पालकर, नारायण पालकर, गजानन पालकर, भागवत शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.