आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथून समर्थ रामदास पूजा करीत असलेल्या विविध देवदेवतांच्या मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, भाविक-भक्तांतून या घटनेचा निषेध व्यक्त होत होता. अनेकांनी आंदोलने, उपोषणेही केली होती. या प्रकरणात गृहमंत्री, आयजी, डीजी यांनीही लक्ष घातले होते. दोन महिन्यांनंतर स्थानिक गुन्हे शाखेसह इतर शाखांतील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघड केला.
यामुळे आयजी एम. मल्लिकार्जुन यांनी जालन्यात येऊन एसपी, एलसीबी पीआय यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत २५ हजारांचे बक्षीस दिले आहे. आयजींकडून बक्षीस मिळणे हा एक प्रकारे रिवॉर्ड असून, सहा अधिकाऱ्यांसह १५ ते २० कर्मचाऱ्यांच्या सीटवर या वैशिष्ट्यपूर्ण तपासाची नोंद होणार आहे. जालना शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मूर्ती चोरीस जाणे, मंदिरातील दानपेट्या, कळस पळवणे अशा विविध चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. याच काळात जांबसमर्थ येथूनही विविध देवदेवतांच्या तेरा मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या होत्या.
यामुळे स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके नेमली होती. तसेच आयजींनीही विविध जिल्ह्यांतील अधिकारी नेमून विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने आपापल्या परीने कामे करून सर्व पाच आरोपी व चोरीस गेलेल्या मूर्ती परत मिळवल्या आहेत.
यामुळे आयजी एम. मल्लिकार्जुन यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, एलसीबी पीआय सुभाष भुजंग यांच्यासह पीएसआय प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विनोद गडदे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, भागवत राऊत, धीरज भोसले, रंजित वैराळ, फुलचंद हजारे, बावणे, भोजने, दत्ता वाघुंडे, प्रशांत लोखंडे यांच्यासह याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासात असलेले पीआय संजय लोहकरे, संतोष मरळ, रामप्रसाद रेंगे, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, रामेश्वर जाधव, सागर बाविस्कर, श्याम सुंदर देवडे, मनोज काळे, हरीश वाघमारे, उमेश राठोड, वसंत राठोड, गजानन मुरकुटे, योगेश सहाणे, रवी जाधव, चंद्रकला शडमल्लू, गोदावरी सरोदे आदींचे कौतुक केले आहे.
सर्वांच्या परिश्रमाचे फलित
मुर्ती चोरी प्रकरणात कोणताही “क्लू’ नसतांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा गुन्हा उघड करता आला आहे. वरिष्ठांकडून बक्षीस मिळणे ही काम करण्यास अजून उमेद देण्यासारखे आहे.-सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.