आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजाची विक्री:गांजाची बेकायदा विक्री; पाच वर्षांचा कारावास

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदा विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सखाराम झाबू पवार (रा. बाजीउम्रद तांडा, ता. जि.जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २० डिसेंबर २०१८ रोजी सखाराम पवार याने बेकायदा विक्रीसाठी ठेवलेला ६ किलो ५०० ग्रॅम गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला होता. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार तसेच तपासी अंमलदार एन. एम. मेहेत्रे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एम. जयस्वाल यांनी आरोपी सखाराम झाबू पवार याला ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहा. वकील जयश्री बोराडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...