आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सेवा बजावत असताना इमानदारी, मेहनत ही तत्त्वे आत्मसात करा

जाफराबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही कार्यक्षेत्रात सेवा बजावत असताना इमानदारी व मेहनत ही दोन तत्त्वे आत्मसात केल्यास नोकरीदरम्यान कुठलीही अडचण आपणास येत नसल्याचे मुख्याध्यापक बी. के. जाधव यांनी सांगितले.जाफराबाद तालुक्यातील सिपोराबाजार येथील ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रारंभी अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश दिवटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. स्वानंद दीक्षित, सोरमारे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नाना पंडित यांनी केले, तर एकनाथ सुरुसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. राजेंद्र अंभोरे, सुनील भोपळे, विजय अंभोरे, विष्णू अंभोरे, योगेश भोपळे, पवन जाधव, समाधान वायाळ, संदेश जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...