आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:यावल पिंपरी ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज गायब; सरपंचांनी केली तक्रार

रांजणी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथुन जवळच असलेल्या यावलपिंपरी ग्रामपंचायतीचे महत्वाचे दस्तावेज गायब झाले असून या संबंधीची तक्रार सरपंच रोहिनी उगले यांनी घनसावंगीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करुन कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीत म्हटले, माझी नुकतीच या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून कार्यभार घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, गावातील रस्ते, इत्यादी कामासंबंधीचे महत्वाचे दस्तावेज गायब झाले आहेत. यासंबंधी कार्यरत ग्रामसेवक शहाणे यांना विचारले असता ते टाळाटाळ करत आहेत. सार्वजनिक विहीर व पाणीपुरवठा दस्तावेज संबंधी रोजगार सेविका कविता उगले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मला या बाबत काहीच माहिती नाही. माझे पती काम पाहतात. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर अाहे. पाणीपुरवठासाठी तीन विहिरींची नोंद असुन या पैकी एक विहीर खासगी, दुसरी रोजगार हमी योजना तर तिसरी विहीर एमआरजीएस अंतर्गत घेण्यात आली आहे.

सदरील एमआरजीएस विहिरीचे रुपये दोन लाख बील रोजगार सेविका यांच्या पतीचे खात्यात जमा करण्यात आल्याची नोंद असल्याचे समजते. तसेच सार्वजनिक विहीरी वर खासगी मोटार पंप बसविण्यात आले असुन त्याद्वारे खासगी पाणी उपसा केला जात आहे. भविष्यात गावातील पाणी पुरवठा सारख्या ज्वलंत समस्येवर याचा परिणाम होऊ शकतो असेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सरपंच रोहिनी उगले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

गावचा विकास हाच ध्यास
गावचा सर्वांगिण विकास करण्याचा आपला ध्यास आहे. महतवाचे प्रश्न असलेले पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व इत्यादी सारख्या मूलभूत आणि ज्वलंत गरजांकडे लक्ष देऊन काम करण्याचा तसेच प्रत्येक महिन्यास ग्रामसभा घेऊन त्या द्वारे विविध योजनांची माहीती देऊन‌ अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विविध योजना गावात पुर्णपणे राबवून पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करण्याचा माझा मानस असल्याचे सरपंच रोहिनी उगले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...