आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कठीण परिश्रमाने अशक्य गोष्टी शक्य

पिंपळगाव रेणुकाई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही असा अपयशी न्युनगंड तरुणांनी आपल्या मनातुन बाजुला काढून मी ते करणारच आणि मला त्यात यश देखील मिळणारच असा दृढ निश्चय मनाशी बाळगून योग्य वयात कठिण परिश्रम घेतल्यास अशक्य गोष्टी देखील आजचे विद्यार्थी ते शक्य करु शकत असल्याचे प्रतिपादन रेणुकादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य ए.के.बावस्कर आणि शिक्षक जे. के.नपते सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला. तसेच दहावी आणि बारावीतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत हाेते. व्यासपीठावर ग्रामीण साहित्यिक रामराव रिढे, राष्ट्रवादीचे संग्रामराजे देशमुख, अरुण देशमुख, भास्कर देशमुख, बबनराव गाढे, सरपंच पंचफुलाबाई बोर्डे, उत्तमराव जाधव, बालासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती. देशमुख यांनी शिक्षक व विद्यार्थी हेच खरी संस्थेची ताकद आहे. शिक्षकापासुन विद्यार्थ्यांना चेतना व उत्तेजना मिळत असते.

आज आमच्या संस्थेतील अनेक विद्यार्थी मोठाल्या विविध प्रशासकीय पदावर काम करीत आहेत. हे त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यावर केलेले योग्य शिक्षण व संस्कारामुळेच शक्य झाले आहे. आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करणे गरजेचे आहे. कठीण परिश्रम घेऊन संस्थेसोबतच आई वडीलांचे देखील नाव रोशन करण्याचा सल्ला दिला. पी. एम. पवार यांनी प्रास्ताविक तर . सुत्रसंचालन आर. टी. देशमुख यांनी केले. यावेळी वैष्णवी कन्हैय्यालाल गुप्ता, कार्तिक नारायण आहेर, मराठी माध्यमातील प्रथम प्रांजली गाडेकर, भाग्यश्री आहेर या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...