आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संवेदनशील माणसातील कौतुक नव्हे, दोष दिसतात

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवस्था इतकी बेताल झाली की चांगल्या, संवेदनशील माणसातील कौतुक नाही तर दोषच प्रत्येकाला दिसतात. नकारात्मक बोलण्याची सवय जडल्याने चांगलं शोधण्याची वृत्ती नाही तर दोष सांगणारे तज्ज्ञ वाढले अशी खंत व्यक्त करत चांगल्या व्यक्तींच्या पाठीशी संस्थांनी उभे राहावे, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी आज येथे बोलताना केले.

मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने नोव्हेंबर महिन्यातील महामानवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिनांचे औचित्य साधत जागृती दिनानिमीत्त बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व कविसंमेलन प्रसंगी ते बोलत होते. उद्दघाटक आ. कैलास गोरंट्याल, सोहळ्याच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका रसना देहेडकर, सुरेखा गाडेकर, रवींद्र अंभोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. हेरंब कुलकर्णी यांनी पुरस्कारांची संख्या वाढल्याने पुरस्कार हा चेष्टेचा विषय झाला असला तरी पुरस्कारांतील भ्रष्टाचार, नाराजी सोडून चांगले कर्तव्य म्हणून पुरस्कारांकडे पहावे असे त्यांनी नमूद केले. प्रशासनातील संवेदनशील अधिकारी, साहित्यिक, कार्यकर्ते यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खच्चीकरण केले जातेय, असेही ते म्हणाले.

तुकाराम मुंढे यांच्या बदली बद्दल महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटत नाही, परिणामी चांगल्या अधिकाऱ्यांचे नीती धैर्य कसे टिकणार ? असा प्रश्न उपस्थित करत प्रत्येक खात्यातील संवेदनशील अधिकारी, निराश होत असलेली चांगली माणसे यांना प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षाही हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात रसना देहेडकर यांनी देशात संविधानाचे तंतोतंत पालन झाल्यास रामराज्य अवतरेल असे सांगून जालन्यात साहित्यिकांसाठी स्वतंत्र सभागृह हवे याकरिता साहित्यिक व कवींनी संघर्ष करावा असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...