आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील चैतन्य योग केंद्र व ठाकरे कोचिंग क्लासेसच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या योग शिबीरास प्रतिसाद मिळाला. उदघाटन उद्योजक सुरेश मगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह शरद खोत, केंद्रप्रमुख मनिष कवडी यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात योगगुरु सुनिल जोशी यांनी धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी आरोग्यसंपन्न राहण्यासाठी योग करावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात मगरे यांनी विद्यार्थी जीवनात व्यायाम व आरोग्याचे महत्व पटवुन सांगितले. सुत्रसंचालन संदिप ठाकरे यांनी तर मनोज दर्जे यांनी आभार केले. शिबीरात सुक्ष्म व्यायाम, शशांकासन, मंडुकासन, उष्ट्रासन, पुर्वउत्तोनासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, धनुरासन, नौकासन, द्रोणासन, पवन मुक्तासन, सर्वांगासन, वुक्षासन, ताडासन, विरासन, त्रिकोनासन, पर्वतासन तसेच प्राणायमात भस्त्रिका, भ्रामरी, अनुलोम-विलोम, ऊंकार, गुंजन घेण्यात आले तसेच बिंदू त्राटक ही योग क्रिया घेण्यात आली. समारोपप्रसंगी विनायकराव देहेडकर, शिवाजीराव कुलकर्णी, सुनिल जोशी, मनोज दर्जे, राजपाल पारचा यांच्यासह आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.