आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी मिरवणुक:आळंदीत वालुरकर महाराजांचे कीर्तन माउलींच्या पालखी मिरवणुकीस आरंभ

सेलूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वालुर येथील पुरुषोत्तम महाराज वालुरकर महाराजांची दिंडी आळंदी ते पंढरपूर पायी वारीत सहभागी असते. वालुरकरांची दिंडी श्री.ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाच्या मागे १५ क्रमांकावर असते.

अण्णासाहेब महाराज वालुरकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र बापूसाहेब महाराज वालुरकर यांनी दिंडीची धुरा सांभाळली. शेकडो वारकरी अध्यात्माच्या प्रवाहात आणुन त्यांच्यात भक्तिभाव जागृत केला. श्री.क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जेष्ठ वद्य सप्तमीला २० जुन रोजी सायंकाळी कीर्तन सेवेचा वालुरकर दिंडीला मान आहे. तसेच सासवड येथे जेष्ठ वद्य द्वादशीला कीर्तन सेवेचा मान आहे. २०जून रोजी पुरुषोत्तम महाराज वालुरकर यांचे मानाचे कीर्तन ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात पार पडले. यावेळी सेलू, वालूर येथील वारकरी सहभागी झाले होते. या वारीला अनेक वर्षापासून परंपरा असल्याचे सांगण्यात आले.