आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणुका म्हटल्या की. हेवे-दावे, भांडण-तंटे, विरोधात काम केले म्हणून मनात कायम वैऱ्याची खुन्नस ठेवणे यासह विविध प्रकारचे कुरघोडीचे राजकारण ठेवले जाते. यात गावाचा विकास तर दूरच स्वतःचीच घरादाराची राखरांगोळी होऊन जाते. त्याला अपवाद काल झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मात्र अंबड तालुक्यातील भार्डी येथे गावकऱ्यांनी एक अनोखा प्रयोग राबवला.
ग्रामपंचायत निवडणूक मतदान पार पडल्यानंतर गावातील मारुती मंदिराच्या पारावर सर्वच राजकीय पक्षातील उमेदवार व त्यांच्या पॅनलप्रमुखांनी ठराव केला होता की. ग्रामपंचायत निवडनूकीमध्ये कोणताही पॅनल निवडणून येऊ, गावामध्ये मिरवणूक न काढता जो कोणी निवडणूकित विजयी होईल त्याचा सर्वांनी एकत्र येऊन विजयी उमेदवारांचा पराभूत उमेदवारांच्या हस्ते सत्कार करतील. व मागच्या पंचवार्षिक मधील ग्रामपंचायत सदस्यांचा देखील निरोप समारंभ होईल, याप्रमाणे सर्वांनी दिलेला शब्द पाळला.
मंगळवारी निवडणुकीचा निकाल लागल्यावर गाावातील सर्वच गटातील विजयी उमेदवार मारुती मंदिराच्या पारावर एकत्र येऊन गावातील पराभूत उमेदवार यांनी मोठं मन करून त्याचे प्रतिनिधी व काही स्वतः पराभूत उमेदवार उपस्थित राहून इतर वरिष्ठ सर्वच गावकऱ्यांनी विजयी उमेदवाऱ्यांचा मारुती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात सत्कार केला. यावेळी सरपंच नवनाथ डोईफोडे, सदस्य, चंद्रकांत काळे, राजेश काळे (उमेदवार प्रतिनिधी), शैलेश कुढेकर, शामराव लांडे, हरून भाई, नासर भाई, भीमराव बर्डे, एकनाथ (पप्पू) सोळंके, दीपक पिसुळे, यांचा सत्कार सर्वच गावकऱ्यांनी व सर्वच पॅनलमधील प्रमुखांनी बोलल्याप्रमाणे सत्कार केला.
व यापुढे गावात विकासाचे राजकारण होईल हा शब्द सरपंच यांनी दिला. या अनोख्या घटनेमुळं गावात कोणता अनुचित प्रकार न घडता शांततेमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. गावातील सर्वांनी आनंद साजरा केला. या सर्व घडामोडीत सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब कुढेकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.