आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:भोकरदन तालुक्यात यंदा 45 हजार हेक्टरवर होणार कपाशीची लागवड ; गतवर्षी मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक भावामुळे शेतकऱ्यांचा कपाशीकडे कल वाढला

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी बाजारपेठेत कपाशीला मिळालेल्या अधिकचा भाव लक्षात घेता यंदाही शेतकऱ्यांचा कल कापसाकडे असल्याचे चिञ आहे. त्यामुळे कपाशीचे आगार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्धी मिळवलेल्या भोकरदन तालुक्यात यावर्षी जवळजवळ ४५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. तालुक्यात बहुतांश शेतकरी उपलब्ध पाण्याचे नियोजन करीत यापुढे ठिबकवर कपाशी लागवड करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान शेतकरी विविध संकटाची टांगती तलवार डोक्यावर घेऊन पुन्हा एकदा आपल्यासाठी नक्कीच अच्छे दिन येथील ही अपेक्षा ठेवत नव्या जोमाने खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने देखील गावागावात जाऊन खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणीकेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठी तडजोड करीत शेती मशागतीचे कामे आटोपती केली आहे. दरवर्षी शेतकरी नगदी पिक म्हणून मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड करतो. गत वर्षी देखील जवळपास ४३ हजार ३०० हेक्टवर शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती.यंदा माञ गत वर्षी कपाशी पिकाला बाजारात जवळजवळ १४ हजार रुपये प्रतिक्विटंल भाव मिळाला.त्यामुळे यंदा देखील कपाशीला चांगला भाव राहील या अपेक्षेने कपाशी पेर्यात पाच ते दहा टक्याची वाढ होणार असल्याने तालुक्यात जवळजवळ ४५ ते ४६ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी ठिबकद्वारे कपाशीची लागवड करण्याच्या तयारीत दिसत आहे. शिवाय यावर्षी हवामान खात्याने चांगला पावासाचा अंदाज वर्तवीला असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.तसेच मृग नक्षञ आणि शेतकरी हे खरीप हंगामाचे समिकरण बनले आहे. मृग नक्षञापासुन खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने शेतकरी सुरूवात करतो. येणाऱ्या पावसाच्या भरवशावरच शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र ठरते. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडतोच. त्याचबरोबर अवकाळीचे अरिष्ट आणि सरकारची वक्रदृष्टी शेतकऱ्याच्या जिवावर उठली आहे. दरवर्षी येणारा हंगाम शेतकऱ्यांची उमेद जागवतो. खरी माञ येताना अनेक अडचणी सोबत घेऊन येतो. या संकटाने शेतकरी संपत आहे माञ शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. कोरोनाने तर दोन वर्षापासून शेतकऱ्यांना जगणे मुश्कील केले आहे. मागील वर्षी तर खरिपात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत सर्वच धुवून निघाले. रब्बीत देखील वारंवार निर्माण होणाऱ्या बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यावर्षीची खरीप पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा समाना करावा लागत आहे. खते-बि-बियाणे भरण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचे उबंरठे झिजवावे लागत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढुन खरीप पेरणीची तयारी केली आहे. यंदा चांगला पाऊस होईल आणि आपल्या भरभरुन उत्पादन होईल या आशेने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची जोरात तयारी केली आहे. भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांना आता एक मोठ्या अवकाळी पावसाची प्रतिक्षा लागून आहे. यावर्षी एक लाख नऊ हजार हेक्टरवर खरीप पेरणी होणार आहे. दरम्यान, गतवर्षी बाजारात कपाशी पिकाला चांगला भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाला अधिक पसंती देणार असल्याचे चिञ आहे. तालुक्यात जवळजवळ ४५ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड होणार आहे. कृषी विभागाच्या सल्यानुसारच कपाशीसह इतर पिकांची पेरणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले.

भोकरदन तालुक्यात यंदा ४५ हजार हेक्टरवर होणार कपाशीची लागवड

शेतशिवार }गतवर्षी मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक भावामुळे शेतकऱ्यांचा कपाशीकडे कल वाढला

पिंपळगाव रेणुकाई गेल्या वर्षी बाजारपेठेत कपाशीला मिळालेल्या अधिकचा भाव लक्षात घेता यंदाही शेतकऱ्यांचा कल कापसाकडे असल्याचे चिञ आहे. त्यामुळे कपाशीचे आगार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्धी मिळवलेल्या भोकरदन तालुक्यात यावर्षी जवळजवळ ४५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. तालुक्यात बहुतांश शेतकरी उपलब्ध पाण्याचे नियोजन करीत यापुढे ठिबकवर कपाशी लागवड करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान शेतकरी विविध संकटाची टांगती तलवार डोक्यावर घेऊन पुन्हा एकदा आपल्यासाठी नक्कीच अच्छे दिन येथील ही अपेक्षा ठेवत नव्या जोमाने खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने देखील गावागावात जाऊन खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणीकेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठी तडजोड करीत शेती मशागतीचे कामे आटोपती केली आहे. दरवर्षी शेतकरी नगदी पिक म्हणून मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड करतो. गत वर्षी देखील जवळपास ४३ हजार ३०० हेक्टवर शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती.यंदा माञ गत वर्षी कपाशी पिकाला बाजारात जवळजवळ १४ हजार रुपये प्रतिक्विटंल भाव मिळाला.त्यामुळे यंदा देखील कपाशीला चांगला भाव राहील या अपेक्षेने कपाशी पेर्यात पाच ते दहा टक्याची वाढ होणार असल्याने तालुक्यात जवळजवळ ४५ ते ४६ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी ठिबकद्वारे कपाशीची लागवड करण्याच्या तयारीत दिसत आहे. शिवाय यावर्षी हवामान खात्याने चांगला पावासाचा अंदाज वर्तवीला असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.तसेच मृग नक्षञ आणि शेतकरी हे खरीप हंगामाचे समिकरण बनले आहे. मृग नक्षञापासुन खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने शेतकरी सुरूवात करतो. येणाऱ्या पावसाच्या भरवशावरच शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र ठरते. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडतोच. त्याचबरोबर अवकाळीचे अरिष्ट आणि सरकारची वक्रदृष्टी शेतकऱ्याच्या जिवावर उठली आहे. दरवर्षी येणारा हंगाम शेतकऱ्यांची उमेद जागवतो. खरी माञ येताना अनेक अडचणी सोबत घेऊन येतो. या संकटाने शेतकरी संपत आहे माञ शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. कोरोनाने तर दोन वर्षापासून शेतकऱ्यांना जगणे मुश्कील केले आहे. मागील वर्षी तर खरिपात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत सर्वच धुवून निघाले. रब्बीत देखील वारंवार निर्माण होणाऱ्या बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यावर्षीची खरीप पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा समाना करावा लागत आहे. खते-बि-बियाणे भरण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचे उबंरठे झिजवावे लागत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढुन खरीप पेरणीची तयारी केली आहे. यंदा चांगला पाऊस होईल आणि आपल्या भरभरुन उत्पादन होईल या आशेने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची जोरात तयारी केली आहे. भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांना आता एक मोठ्या अवकाळी पावसाची प्रतिक्षा लागून आहे. यावर्षी एक लाख नऊ हजार हेक्टरवर खरीप पेरणी होणार आहे. दरम्यान, गतवर्षी बाजारात कपाशी पिकाला चांगला भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाला अधिक पसंती देणार असल्याचे चिञ आहे. तालुक्यात जवळजवळ ४५ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड होणार आहे. कृषी विभागाच्या सल्यानुसारच कपाशीसह इतर पिकांची पेरणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...